चाललीस तू जाता जाता
मागे वळून पाहशील का?
आयुष्यात नाही तर नाही
पहाटेच्या स्वप्नात तरी येशील का....
चाललीस तू जाता जाता
माझे एक ऐकशील का?
जीवनसाथी नाही तर नाही
मैञीण बनून राहशील का....
चाललीस तू जाता जाता
कधीतरी माझी तू आठवण
काढशील का....
सासरी नाही तर नाही
माहेरी आल्यास तरी
मला बोलशील का.............
मी तर नेहमीच अश्रू
पुसले गं तूझे,
तू मात्र माझ्या अश्रूंची
किंमत ठेवलीच नाहीस
मी तर नेहमीच रडलोय
गं तूझ्यासाठी.....
तू मात्र माझ्यासाठी एक
थेंबही वाहीला नाहीस...