Friday, December 20, 2019

एक वेडी मैत्रिण

एक वेडी मैत्रीण





🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

एक वेडी मैत्रीण आहे बरं का माझी,

नेहमीच करत बसते दुसऱ्याचीच काळजी.....
थोडीशी आहे अल्लड,थोडीशी नाजूक परी,
प्रेमळही आहे खूप,
जणू श्रावणातली रिमझिम.....

पाणीपुरी खायला जाते 

अन् येते शेवपुरी खाऊन.

निघते घरातून क्लासला
 अन येते पिक्चर पाहून......
🍀🥀🍀🥀🍀🥀🍀🥀🍀🥀🍀🥀🍀🥀🍀
                माझ्यासोबत बागेत जायला निघते
               अन् नेते काॅफीशाॅपला .....

वाट पाहायला लावणं हा तर तीचा गुणविशेष.....



माझ्या सुखात तर सगळेच येतात,

पण दुःखात साथ देणारी
ती एकटीच आहे,

🌹एकटी जरी असली तरी लाखात भारी आहे🌹

आयुष्यात गर्लफ्रेंड नसली 

तरी चालेल,

पण आयुष्यभर साथ देणारी 
वेडी मैत्रीण 
नक्कीच सोबत असावी.....
☘☘🌹🌹☘☘🌹🌹☘☘🌹🌹☘☘🌹                                  थोडीशी वेडी आहे,
                    पण मतलबी अजिबात नाही.
                 समजायला थोडी अवघड आहे, 
                   पण ज्याला समजली
                   त्याच्यासाठी खास आहे.


देवा तिला नेहमी

सुखातच ठेवशील ना 
जन्मोजन्मी तिला माझीच
मैत्रीण म्हणून पाठवशील ना...
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀