Sad love story
पाऊस आला कि आपण दोघे
दिवसभर भिजायचो,
दोघांनी सोबत घालवलेले
क्षण मनामध्ये साठवायचो,
पुन्हा पुढच्या पावसाची
वाट बघायचो..........
पुन्हा पुढचा पाऊस यायचा
पण या पावसाळ्यात वेगळंच घडलं होतं,
कारण तुझं लग्न ठरलं होतं......
या पावसाळ्यातही खूप पाऊस आला,
आभाळातूनही आणि माझ्या डोळ्यांतूनही,
हा पाऊस दिसलाच नाही गं....
दिसला तो फक्त आभाळातला,
मग पाऊस थांबला
पुन्हा याही वेळेस पाऊस आला
तुझ्यासोबत तुझा नवरा होता,
तुम्ही दोघे पावसात मनसोक्त
भिजत होता...........
पावसाच्या सरी अंगावर घेत होता,
मुद्दाम माझ्या कडे बघत...
मग पाऊस थांबला....
पुन्हा पुढच्याही वेळेस पाऊस येईल....
कदाचित तेंव्हा माझ्याही सोबत
माझी बायको असेल........
माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी,
आणि आयुष्यातल्या प्रत्येक
क्षणातल्या पावसात माझी
साथ देणारी.........
आम्हीही पावसात मनसोक्त भिजू
पावसाच्या सरी अंगावर घेऊ,
तेही तुझ्याकडे प्रेमाने बघत
कारण तुझं लग्न ठरलं होतं......
या पावसाळ्यातही खूप पाऊस आला,
आभाळातूनही आणि माझ्या डोळ्यांतूनही,
हा पाऊस दिसलाच नाही गं....
दिसला तो फक्त आभाळातला,
मग पाऊस थांबला
पुन्हा याही वेळेस पाऊस आला
तुझ्यासोबत तुझा नवरा होता,
तुम्ही दोघे पावसात मनसोक्त
भिजत होता...........
पावसाच्या सरी अंगावर घेत होता,
मुद्दाम माझ्या कडे बघत...
मग पाऊस थांबला....
पुन्हा पुढच्याही वेळेस पाऊस येईल....
कदाचित तेंव्हा माझ्याही सोबत
माझी बायको असेल........
माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी,
आणि आयुष्यातल्या प्रत्येक
क्षणातल्या पावसात माझी
साथ देणारी.........
आम्हीही पावसात मनसोक्त भिजू
पावसाच्या सरी अंगावर घेऊ,
तेही तुझ्याकडे प्रेमाने बघत
तेंव्हा
तुलाही कळेल कि,
तुलाही कळेल कि,
आभाळातल्या आणि डोळ्यातल्या
पावसात फरक काय असतो ते.......
पावसात फरक काय असतो ते.......