🌹🌹 असं वाटतंय🌹🌹
असं नेहमी वाटतंय,
डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी
पाहणारं असावं,
ह्रदयातून येणारं दुःख कोणीतरी
जाणणारं असावं.....
मनातून येणारी आठवण कोणीतरी समजणारं असावं,
जीवनात सुखदुःखात साथ देणारं,
आपलसं कोणीतरी असावं......
असं नेहमी वाटतंय,
मला तुझी गरज आहे,
हे शब्दात नाही सांगता आलं तरी,
डोळ्यातून समजून घेणारं
कोणीतरी असावं....
अस्वस्थ होईन मी जेंव्हा धीर देणारं कोणीतरी असावं,
सगळे खोटं ठरवतील मला,
तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवणारं
कोणीतरी असावं......
आयुष्याच्या वाटेवर एकटा पडलो,
तर हातात हात देणारं,
कोणीतरी असावं..
चुकतोय मी असं कधी वाटलंच तर,
हक्काने मला सांगणारं कोणीतरी हवंय...