आवडतं मला
तुझं लपून उगाचंच हसणं,
क्षुल्लक गोष्टींवरून रूसणं,
तुझं दिवसरात्र काळजी करत
बसणं आवडतं मला.............
तुझं नजरेतच सुंदर लाजणं,
चांदण्या बघत निजणं,
तुझं प्रितीच्या पावसात चिंब
भिजणं, आवडतं मला....
तुझं बोलता बोलता बावरणं,
मनातल्या भावनांना सावरणं,
प्रेमात पडूनही स्वतःला
आवरणं,
आवडतं मला......
तू समोरून येता,
काळजात धडधडायला होतं,
तुझं जाता जाता मागे
वळून पाहणं,
आवडतं मला........
तुझं हसणं तुझं लाजणं,
फुलापेक्षा कमी नाही,
तुझ्या प्रेमात कधी पडलो,
माझं मलाच माहित नाही,
तरीही तू खुप आवडतेस
आणि आवडतं मला तुझ्या प्रेमात पडायला..................