खरं प्रेम
खरं प्रेम हे दूरदर्शन सारखं असावं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं....
एक क्षण लागतो कोणाला तरी रडण्यासाठी,
एक नजर लागते कोणावर तरी
प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्यास
विसरण्यासाठी....
लिहिताना जपावी ती आठवण मनातली,
रडताना लपवावे ते पाणी
डोळ्यातले,
बोलताना गुंफावे ते शब्द
ओठांतले,
आणि हसताना विसरावे
ते दुःख मनातले.........
जगावे असे कि मरणे
अवघड होईल,
हसावे असे कि रडणे
अवघड होईल,
कोणाशीही मैत्री करणे सोपे आहे,
पण मैत्री टिकवावी अशी
कि ,
ती तोडणे अवघड होईल......